मध्यप्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेत बहुमत चाचणी पारित करण्यासाठी काँग्रेस सरकारला २६ मार्चपर्यंत मुदत वाढ मिळाल्याने कमलनाथ सरकारला दिलासा मिळाला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मध्य प्रदेश विधानसभा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला बहुमत चाचणीसाठी आणखी काही काळ वेळ मिळणार असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
या बहुमत चाचणीवर अडून बसलेल्या भाजपने राज्यपालांच्या अभिभाषणानंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभा सभापती एन. पी. प्रजापती यांनी पहिल्यांदा १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर बहुमताची पुन्हा मागणी करत भाजपने चांगलाच हंगामा केला. त्यामुळे विधानसभा सदस्यांनी विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा