मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोविड -१९ पॉझिटिव्ह

मध्य प्रदेश, दि. २५ जुलै २०२०: अलीकडच्या काळात अनेक राजकीय व्यक्तींना कोविड -१९ ची लागण होताना पाहण्यास मिळत आहे. नगरसेवक आमदार खासदार अशा राजकीय व्यक्तींना कोविड -१९ ची लागण झालेली आतापर्यंत आपण पाहिले. पण, आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनादेखील कोविड -१९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे .

आपला कोविड -१९ चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी सर्व नियम पाळून स्वतःला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी यावेळी नागरिकांना आपली काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हटले आहेत की, “माझ्यामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी, तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घ्यावे”

“करोनावर वेळीच उपचार झाले तर व्यक्ती बरी होते. २५ मार्चपासून मी दररोज संध्याकाळी राज्यातील कोरोनाच्या स्थितीची समीक्षा करण्यासाठी बैठक करायचो. आता मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समीक्षा बैठक करण्याचा प्रयत्न करेन” असे शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा