मध्य प्रदेश : इंदौरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

26

इंदौर, १९ फेब्रुवारी २०२३ : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये आज म्हणजेच रविवारी दुपारी भूकंपाचे धक्के सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल एवढी होती.

मिळालेल्या माहितीनुसार , दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर आत होता. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. यासोबतच धार, बडवानी आणि अलिराजपूर या ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक