मदुराईहून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे इंजिन हवेतच पडले बंद

मदुराई, २९ ऑगस्ट २०२३ : मदुराईहून आलेले इंडिगोचे विमान आज दुपारी मुंबई विमानतळावर एक इंजिन बंद असतानाही सुरक्षितपणे उतरले आहे. हवेतच प्रवासात असताना इंडिगो A३२१ विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. प्रॅट ऑंड व्हिटनी इंजिन बंद पडले, तरीही वैमानिकांनी सुरक्षित लॅंडिग केले आहे.

मदुराईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईट मध्ये मुंबईत उतरण्यापूर्वी तांत्रिक बिघाड झाला. दुहेरी इंजिन असलेले विमान एका इंजिनवर सुरक्षितपणे चालू शकते. पायलटने हे विमान मुंबईत सुरक्षित उतरवले असून दुरुस्ती नंतर ते पुन्हा कार्यरत होईल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो, असे इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा