खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध महा सायबरची कारवाई

मुंबई, दि. १५ मे २०२०: लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध महासायबरने कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामध्ये ३७९ गुन्हे नोंदविले गेले आहेत. २०७ जणांना या गुन्ह्यांन अंतर्गत अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण, नांदेड मध्ये नवीन गुन्ह्याची नोंद झालेली बघावयास मिळत आहे.

आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १६२ गुन्हे, फेसबूक पोस्ट्स शेअर १४८, टिक टॉक विडिओ शेअर १६ व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट ७, इंस्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट ४ तर अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश.

गुन्ह्यांमध्ये बीड ३७, पुणे ३०, जळगाव २६, मुंबई २१, कोल्हापूर १६, नाशिक १६, सांगली १४, ठाणे शहर १३, बुलढाणा १२, जालना १२, नाशिक शहर ११, नांदेड ११, सातारा १०, पालघर १०, लातूर १०, नागपूर शहर ९, नवी मुंबई ९, परभणी ८ या शहर-जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा