आज पूर्व मध्य अरबी समुद्रातील ‘महा’ या तीव्र चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. चक्रीवादळाच्या केंद्रातील वाऱ्याचा वेग हा १४० ते १७० यादरम्यान असणार आहे दरम्यान हा वेग १८५ किलोमीटर प्रति तास पर्यंत ही जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात मधील पोरबंदर च्या किनार्यापासून ५९० किलोमीटर असलेले अंतरावर हे चक्रीवादळ आज आपला मोर्चा गुजरातच्या दिशेने वळणार आहे. त्यामुळे गुजरात सह उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण या भागांमध्ये बुधवार दिनांक ६ आणि गुरुवार दिनांक ७ तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच किनारपट्टीवरील भागांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.