पुणे : देशात, तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,
देशात कोरोना ग्रस्तांचा सर्वात जास्त आकडा महाराष्ट्रात आहे त्यात सर्वात जास्त पुण्यात रुग्ण आहे. पण या सर्वात एक अनोखा प्रयोग पुण्यातील एक सफाई कामगाराने केला आहे. महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातले सफाई कर्मचारी रातोरात फेमस बनले होते. त्यांनी एक व्हिडीओ तयार करत पुणेकरांना कचरामुक्तीचे धडे दिले. त्यांचा व्हिडीओ फेमस झाल्यानंतर पालिकेने त्यांना ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं.
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक गाणं तयार केलं असून कोरोनापासून दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे याचे धडे दिले आहेत. त्यांचा हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. या आधी असे गाणे गाऊन लोकांमध्ये ओला आणि सुका कचरा या बाबत जनजागृती करणारे पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी महादेव जाधव शहरातील विविध भागात आता कोरोनाचि जनजागृती करत आहे.
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक गाणं तयार केलं असून कोरोनापासून दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे याचे धडे दिले आहेत. त्यांचा हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे.