महान गणिततज्ञ वशिष्ठ नारायण यांचे निधन

मुंबई: महान गणिततज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे नुकतंच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने भावुक होत दुःख व्यक्त केले.
त्याने सोशल मीडियावरून एक ट्विट केले की, आज आपण किती मोठ्या गणितज्ञाला गमावले आहे. याचा मी विचारही करू शकत नाही.
गणिततज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचा बिहारमधील एका छोट्याशा गावात जन्म झाला होता. त्यांनी कित्येक अवघड गणिते सोप्या पद्धतीने कशी सोडवायची याचा अभ्यास केला होता. आणि तसे विद्यार्थीही त्यांनी घडविले होते.

वशिष्ठ नारायण काही दिवसांपासून आजरी होते. ते रुग्णालयातच उपचार घेत होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांना घरी नेण्यात आले होते. मात्र, गुरुवारी (दि.१४) रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एवढेच नाही तर त्यांच्या निधनानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जवळपास एक तास वशिष्ठ यांचा मृतदेह रुग्णालयाबाहेरच असल्याचे समोर आले आहे. वशिष्ठ नारायण वशिष्ठ यांनी नासा आणि कॅलिफॉर्निया विद्यापीठात काम केलेले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा