छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर,१३ फेब्रुवारी २०२४ : निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्यावतीने महामानव घरोघरी अभियानांतर्गत आपल्या सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठ्या भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या निबंध स्पर्धेचा सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज जीवन, कार्य आणि विचार असा विषय आहे.

या भव्य महानिबंध महास्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे महाबक्षीस पाच लाख रुपयांचे असून यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके देण्यात येणार आहेत. द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस तीन लाख रुपयांचे असून यामध्ये पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वीस बक्षीसे उत्तेजनार्थ असून प्रत्येकी दहा हजार ज्यामध्ये एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके देण्यात येणार आहेत.या भव्य महानिबंध महास्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकास दोन हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

या भव्य महानिबंध महास्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त पाचशे स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० मार्च, २०२४ आहे तर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल, २०२४ असून या स्पर्धेचा निकाल ३० मे, २०२४ सायंकाळी ६:०० वा. जाहीर केला जाणार असून बक्षीस वितरण २६ जून, २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असून निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास ९४२०३६११२२ या व्हाट्सअँप नंबरवर निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवावी असा मेसेज वा किंवा निर्मिती फिल्म क्लब, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, ८७३, क/२, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर-४१६००२ या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा