कोल्हापूरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता याविषयावर महानिबंध स्पर्धा

कोल्हापूर १८ डिसेंबर २०२३ : महामानव घरोघरी अभियाना अंतर्गत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर आयोजित विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानवादी विचारमुल्यांचा प्रसार, प्रचार आणि जागर करण्यासाठी, प्रथमच महाराष्ट्र व मराठी भाषेतील सर्वात मोठ्या भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता हा महानिबंध महास्पर्धेचा विषय असून प्रथम क्रमांकाचे ५,००,०००/- (एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके), द्वितीय क्रमांकाचे ३,००,०००/- (पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके) तर तृतीय क्रमांकाचे १,००,०००/- (पंचवीस हजार रुपये रोख आणि पंच्याहत्तर हजारांची पुस्तके) अशी महाबक्षीसे आहेत. सोबत उत्तेजनार्थ ५० बक्षीसे प्रत्येकी दहा हजार (एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके) बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास २०००/- हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र ही मिळणार आहे.

या निबंध स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त 500 स्पर्धकांनाच प्रवेश भेटणार असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर, २०२३ असून निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३० जानेवारी २०२४ ही आहे. निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास 8421364129 या व्हाट्सअँप नंबरवर निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा, असा मेसेज पाठवावा किंवा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर या ठिकाणी भेटावे. भव्य महानिबंध महास्पर्धेचे मुख्य आयोजक धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट असून सह आयोजक शिवराय फुशांबु ब्रिगेड, सम्यक समाज- लातूर, भगवा फौंडेशन- मुंबई, निर्मिती विचारमंच- कोल्हापूर या संस्था आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा