अखेर पहिल्या फेरीची निवडयादी ३० जूनला होणार जाहीर

FYJC First Merit List 2025 Announcement
पहिल्या फेरीची निवडयादी ३० जूनला होणार जाहीर;

FYJC First Merit List 2025 Announcement: अखेर अकरावी निवडयादीची तारीख जाहीर करण्यात आली असून ३० जूनला ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने प्रथमच राज्य पातळीवर राबवण्यात येत आहे. यात काही तांत्रिक कारणामुळे २६ जूनला सादर होणारी हि निवड यादी सुधारित वेळापत्रकानुसार ३० जूनला जाहीर होणार आहे .यानंतर ज्यांचा प्रवेश जाहीर होईल त्या विद्यार्थ्यांना ७ जुलै पर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे .

प्रवेशासाठीच्या संकेस्थळावरील माहितीनुसार राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. त्यात १६ लाख ६० हजार ८४ जागा कोटा प्रवेशासाठी, तर ४ लाख ६३ हजार ६३६ जागा कोटा प्रवेशासाठी आहेत. प्रवेशासाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. कोट्यातून ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची निवड यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार होती. तसेच, २७ जून ते ३ जुलै या कालावधीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करता येणार होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे निवडयादी जाहीर करता आली नाही. परंतु आता ३० जूनला ज्यांचा प्रवेश जाहीर होईल त्या विद्यार्थ्यांना ७ जुलै पर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे .

तसेच दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा ९ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्यांक शाळा-महाविद्यालयातील एकूण प्रवेश क्षमतेतील प्रवेशाबाबत फेरबदल करणे अपेक्षित आहे. तसेच, काही तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारी गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करता आली नाही. आता सुधारित वेळापत्रकानुसार पारदर्शकपणे हि निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे . दहावीचा निकाल जाहीर होऊन अनेक दिवस उलटले तरीही अकरावी प्रवेश हा का रखडला जातोय ह्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय . यासाठी विद्याथ्यांसह पालकांनी आवाज उठवणे आवश्यक आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे