जालना २५ जानेवारी २०२४ : भारतीय प्रजासत्ताक दिन सभारंभा निमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१५वाजता होणार आहे.
तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सकाळी ८. १५ वाजता ध्वजारोहण केले जाणार आहे. तरी सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था आदी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी