मास्क, सॅनिटायझरच्या किमती नियंत्रणात ठेवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य – राजेश टोपे

मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: कोरोना विषाणू पासून संरक्षण करणाऱ्या मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती नियंत्रणात ठेवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. मास्क आणि सॅनिटायझर भरमसाठ किंमतीला विकले जात आहेत, या गोष्टीची नोंद सरकारनं घेतली असून त्यात सरकार लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले .

या वस्तूंच्या दर्जावर आधारित किंमत लवकरच निश्चित केली जाईल आणि त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या जातील असंही ते यावेळी म्हणाले. कोरोना निदान चाचणीचं शुल्क प्रत्येक १ हजार ९०० रूपये इतकं निश्चित करण्यात अाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ववत करण्याबाबतचा निर्णय केंद्रसरकार घेईल, तसंच कोरोनाबाबतची परिस्थिति लक्षात घेऊन उपाहारगृह आणि जिम्नॅशिअम सुरु होतील, असं ही टोपे यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा