येत्या नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होण्याची शक्यता: राजेश टोपे

अहमदनगर, १० ऑक्टोबर २०२०: सध्या राज्यात बऱ्यापैकी सर्व गोष्टी सुरू करण्यात आलेल्या आहे. कामकाजाविषयी सर्व स्थिती पूर्ववत आलेली आहे. मात्र, कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. १ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारनं नवीन अनलॉक नियमावली जाहीर केली. यंदाही अनेक सुविधा देण्यात आल्या. मात्र, राजेश टोपे यांनी याबाबत आता एक नवीन संकेत दिला आहे. अहमदनगर मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार, कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळं आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे,” असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्वच गोष्टी पूर्ववत करण्याबाबत ते म्हणाले की, “येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,”

सध्या देशात फार मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीवर काम सुरू आहे. त्यातील काही लसींवर वर मानवी चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. असं असलं तरीही अद्याप ही लस सामान्य व्यक्तींसाठी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळं या विषाणू सोबत जगण्याची आपण आता सवय लावून घेतली पाहिजे असं सांगत ते म्हणाले की, “कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही. त्यामुळं आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. त्यामुळं आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे.”

आरटी पीसीआर टेस्टची किंमत करणार कमी

“तसेच आरटी पीसीआर टेस्टची किंमत ८०० रुपयांपर्यंत आणला आहे. याची किंमत केंद्र सरकारनं साडे चार हजार रुपये ठरवली होती. मात्र आम्ही दोन टप्यात तो खाली आणला आहे. तसेच येत्या आठवड्यात तो आठशे रुपयांपर्यंत आणणार,” त्याशिवाय मास्कच्या किंमतीदेखील खाली आणल्याचं टोपे यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा