नवी दिल्ली, १७ डिसेंबर २०२०: कोरोना काळात देशातील आर्थिक कणा अक्षरश: मद्द विक्री वर सुधारल्याचे समोर आले होते. त्यामुळे तळीरामांची चांदीच झाली होती. प्रत्येक मद्दप्रेमी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत दारू खरेदी करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दृश्य ही आपण पाहीले असेल. दरम्यान देशात दारु वर सर्व्हेक्षण करण्यात आले.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य २०१९-२० ची आकडे वारी समोर आली आहे. ज्या मधे व्यसन करण्यार्यांवर हा आकडा आला असून देशात हा सर्व्हे करण्यात आला. महाराष्ट्राचा देखील या सर्वेमध्ये समावेश होता. तर तसेच महिलांचा ही या मधे सर्व्हे करण्यात आला.
दारू पिण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील पुरूष हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात आधी पासूनच तळीरामांची कमी नसून देशातील महाराष्ट्रातील दारू पिण्याच्या बाबतीत असलेला देशातील तिसर्या क्रमांक हा काही महाराष्ट्रासाठी नवीन नसून महाराष्ट्रातील वृद्धांपेक्षा तरुणांची संख्या या मधे मोठ्या प्रमाणात आहे.
कर्नाटकातील पुरूष सर्वाधिक दारू पितात. तर दारूबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू काश्मीर मधे सर्वात कमी लोक दारु पितात. महिलांचा विचार केल्यास सिक्कीम राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारू पितात ज्याची १६.२ टक्केवारी आहे.
देशात दारूपेक्षा तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणात होते…..
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य २०१९-२० आलेल्या आकडेवारीत भारतात दारू पेक्षा तंबाखू चे सेवन जास्त केले जाते. ईशान्येकडील मिझरोम तंबाखू वापरण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मिझरोम मधे ७७.८% पुरूष तर ६५ % महिला तंबाखूचे सेवन करतात. तर केरळ मधे सर्वात कमी म्हणजे १७% तंबाखूचे सेवन होते. तर महिलांच्या बाबतीत हिमाचल प्रदेश मधे १.७% तंबाखूचे सेवन केले जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव