महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका या पत्रकार संघाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून,सामाजिक जाणिवेतून सुरू आहे त्यामुळे या पत्रकार संघाच्या संकल्पनेतील पत्रकार भवन तसेच पत्रकारांची गृहनिर्माण संस्था उभारणीसाठी पाहिजे तेवढा निधी पुरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असा शब्द सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना मोफत हेल्मेटचे वाटप, तसेच पत्रकार संघाचे आयकार्ड वाटप व पत्रकार संघाच्या दिनदर्शिका 2020 चे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात वाटप करण्यात आले.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव,आंबेगाव तालुक्याचे समीर पठाण,इंदापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महारुद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल भिसे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर नाना गलांडे,पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,कार्याध्यक्ष जावेद मुलानी,तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ, कार्यकारणी सदस्य भिमराव आरडे,आबासाहेब उगलमोगले,उदयसिंह देशमुख,दत्तात्रय गवळी,लक्ष्मण सांगवे,योगेश कणसे,अमोल रजपुत,रामदास पवार,शिवाजी आप्पा पवार,नानासाहेब मारकड,भारत शेंडगे,आदम पठाण,काशिनाथ सोलंनकर,तानाजी काळे,शिवकुमार गुणवरे,सचिन खुरंगे,नितीन चितळकर,इम्तिहाज मुलाणी,विजय शिंदे,गोकुळ टांगसाळे,प्रविण नगरे,प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे,स्वप्नील चव्हाण,शंकर मासाळ, यांच्यासह तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तब्बल सत्तर सदस्य व प्रेस फोटोग्राफर उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,अवघ्या काही महिन्यापूर्वी इंदापूर तालुक्यांमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना झाली, तरीदेखील पत्रकारांचे संघटन मजबूत करण्यासाठी एकीचे बळ वापरून संघटनेची ताकद मोठी निर्माण झाले आहे.पत्रकार क्षेत्रातील पत्रकार बंधू वार्तांकनासाठी सातत्याने धडपड करीत असतात,यांच्या संरक्षणाकरता पत्रकार संघाच्या माध्यमातून मोफत हेल्मेट उपलब्ध करून देण्याची भूमिका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे,ग्रामीण भागातील पत्रकारांना मोठा आधार प्राप्त झाला आहे.इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी तालुक्यातील रस्ते अद्यावत होण्यासाठी अपुऱ्या राहिलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी इंदापूरला येत आहे त्यामुळेच उपेक्षितांचे प्रश्न मार्गी लागत आहे.यामध्ये तालुक्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न कुठेही मागे राहू नयेत म्हणून अद्यावत पत्रकार भवन तसेच पत्रकारांची गृहनिर्माण संस्था उभारण्यासाठी शासनाच्या वतीने लागणारी सर्व मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे म्हणाले की, पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार हा केंद्रबिंदू मानला आहे त्यामुळे पत्रकारांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कायम कटिबद्ध राहणार आहे, शासनस्तरावरून राज्यातील सर्व पत्रकारांना हक्काचा निवारा प्राप्त करून देण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रयत्न करावेत अशीही अपेक्षा राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केली.

इंदापूर तालुका पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून वेगवेगळे उपक्रम राबवून पत्रकारांचे संघटन मजबूत केले आहे असेही गौरवोद्गार पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी काढले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना सुदैवाने येणाऱ्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी मदत दिली जाईल तसेच पत्रकारांना सातत्याने संरक्षण म्हणून विमा उतरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कामकाज केले जाईल अशी ही माहिती पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंदापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले.

” पत्रकार संघाच्या वतीने महिलांचा सन्मान ”

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या हिराताई पवार व त्यांच्या समवेत काम करणाऱ्या तब्बल दहा भगिनींचा अनोखा सन्मान सोहळा यावेळी पार पडला.

” इंदापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी अहोरात्र काम करण्याची तयारी ”

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका पत्रकार संघासाठी अहोरात्र काम करण्याची तयारी ठेवलेली असून अध्यावत पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करणे व याच जागेवर तालुक्यातील तमाम पत्रकार बंधूंसाठी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पक्की घरे उभारणे यासाठी कटीबद्ध राहणार आहे अशी ग्वाही इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा