६००० कुटुंबांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिला आधार

इंदापूर, दि. १२ मे २०२०: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका सामाजिक जाणिवेतून समाजाचे काम करत असून, गोरगरीब हजारो कुटुंबांना पत्रकार संघाच्या माध्यमातून संकटाच्या काळात आधार मिळाला आहे व जीवनावश्यक वस्तू पुरवण्याच्या उपक्रमाचे कामकाज प्रेरणादायी आहे. तालुक्यातील तब्बल ६ हजार कुटुंबांना मोफत वस्तूंचे वाटप करुन आधार दिला आहे. असे गौरवोद्गार जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व सामाजिक संस्था सी वाय डी ए पुणे, तसेच शहर – ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब, गरजू व शेतमजूर दिव्यांग कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे तसेच सी वाय डी ए चे संचालक प्रवीण जाधव यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील गोखळी येथे  संपन्न झाला. यावेळी ढोले बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, उपाध्यक्ष संदीप सुतार, मुख्य सचिव सागर शिंदे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले, भिमराव आरडे, दत्तात्रय गवळी, निखिल कणसे, विजय शिंदे, प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे राजेंद्र भोसले यांच्यासह गोखळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे माहिती देताना श्रीमंत ढोले म्हणाले की, पत्रकार बंधू आपल्या लेखणीतून समाजाचे प्रश्न सोडवत असतात, हे प्रश्न सोडवत असताना राज्यावर देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी, मोठ्या धाडसाने इंदापूर तालुक्यातील हजारो गरीब कुटुंबांना धान्य वाटप, जीवनोपयोगी वस्तू वाटप उपक्रम राबवून खऱ्या सामाजिक जाणिवा जपण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे पत्रकार बांधवांच्या समस्या आगामी काळात सोडवण्यासाठी आम्ही नक्की हातभार लावू असा शब्द माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिला.

यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे म्हणाले की, जे गोरगरीब जनतेच्या जीवावर मोठे झाले खुर्चीवर बसले त्यातील एक जण या गोरगरीब जनतेला संकटाच्या काळात विसरले आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका या संघाच्या पदाधिकारी यांना कोणत्याही सामान्य जनतेकडून अपेक्षा नसताना, संकटाच्या काळात मदतीचा हात देत गरीब कुटुंबाची चूल चालवली आहे गरीबांची भूक भागवण्याचे काम पत्रकार बांधवांनी केले आहे. ही गोष्ट जनता आयुष्यभर विसरणार नाही अशी ग्वाही शशिकांत तरंगे यांनी दिली.
– गोखळी गावच्या सरपंच अलकाताई

पोळ, उपसरपंच तुकाराम वाघमोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य बापुराव पोळ, बाळासाहेब महारनवर, ग्रामसेवक भोरे भाऊसाहेब, मावली वाघमोडे, यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा