महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई ,१० ऑक्टोबर २०२० : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणार असलेली परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली.

लॉकडाऊनचे निर्बंध आता बऱ्यापैकी शिथिल झाले आहेत. मात्र ते झाल्यानंतर लगेचच ही परीक्षा येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून ती परीक्षा पुढं ढकलली असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याआधी मराठा आरक्षणसंदर्भात मराठा समाजाच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यांच्याही काही मागण्या होत्या, तसंच अन्य ठिकाणाहूनंही परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली जात होती. सर्व गोष्टीचा विचार रकरुन हा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

परिक्षेची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर, आता परिक्षेला पात्र असणारा एकही उमेदवार त्यावेळीही अपात्र ठरणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा