बायोटेक स्टार्टअप्स मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई ९ ऑगस्ट २०२२ : महाराष्ट्रात चालू स्थितीत 966 बायोटेक स्टार्टअप आहेत, जी कोणत्याही राज्यातील सर्वात मोठी संख्या आहे. त्यानंतर कर्नाटकात ६९७ स्टार्टअप्स आहेत, तर दिल्ली-एनसीआरमध्ये ५९० आणि तेलंगणामध्ये ५६३ स्टार्टअप्स आहेत. गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन बायोटेक स्टार्टअप्सची नोंदणी झाली, त्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो, असे एका नवीन अहवालात दिसून आले आहे.

असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीने जारी केलेल्या इंडिया बायोइकॉनॉमी रिपोर्ट (IBER २०२२) नुसार, महाराष्ट्र राज्यात १४५ नवीन बायोटेक स्टार्टअप्सची नोंदणी झाली, त्या खालोखाल तेलंगणा (१००), कर्नाटक (९५), उत्तर प्रदेश (९३) आणि दिल्ली-एनसीआर (९०) अगदी मागे आहेत.

बायो-इनक्यूबेटर, सीड मनी आणि सरकारद्वारे केलेल्या मार्गदर्शन आणि समर्थना मुळे बायो-इनोव्हेटर्सना एएमआर, बायो-स्टिम्युलंट्स, कॅन्सर जीनोमिक्स, जीन एडिटिंग आणि सिंथेटिक बायोलॉजी यासारख्या बायोटेकच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संधी शोधण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा