महाराष्ट्राचे परीवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२०: महाराष्ट्रात मंत्र्यांना कोरोना होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री तसेच शिवसेनेचे नेते अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती अस्थिर होती. याच कारणास्तव त्यांची कोव्हिड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.

यांनतर त्यांना बांद्रा मधील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन देखील केले होते. तसेच त्यांच्या संपूर्ण स्टाफची आणि विभागाची योग्य ती काळजी घेतली होती. परंतु त्यांना लक्षणे दिसू आल्यानंतर त्यांनी कोव्हिड चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनिल परब यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना तसेच कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. तसेच सर्वांनी आपली कोव्हिड चाचणी करून घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. परंतु परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा