Maharashtra ZP Election -: महाविकासआघाडीने राखलं आपलं वर्चस्व, जाणून घ्या संपूर्ण निकाल

मुंबई, 7 ऑक्टोंबर 2021: राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागलेत. या पोटनिवडणुकीत राज्यातील 6 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या 85 जागांसाठी आणि 144 पंचायत समितीच्या जागांच्या निकालाची घोषणा झाली. 5 ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाली. या बहुतांश ठिकाणी महाविकासआघाडीने आपलं वर्चस्व राखलंय.
पक्ष म्हणून केलेल्या कामगारीकडं पाहिलं तर भाजपने जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक 23 जागा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी 17 जागा आणि शिवसेनेने 12 जागां जिंकल्या. नागपूर आणि नंदूरबारमध्ये काँग्रेसचे वर्चस्व दिसून आलंय. तर धुळ्यातली सत्ता राखण्यात भाजपला यश आलंय. अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिश्मा पाहायला मिळाला. इकडे पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजप उमेदवार पंकज कोरे खासदार पुत्र रोहित गावित यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले. तर वाशिममध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी बाजी मारत प्रतिष्ठेची जि.प राखली.
जिलहा परिषदेत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या बाजी?
💠 धुळे – 15 (भाजप 8, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2, इतर 0)
💠 नंदूरबार – 11 (भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस, 3 इतर 0)
💠 अकोला – 14 (14 भाजप 1 शिवसेना 1 राष्ट्रवादी 2 काँग्रेस 1 वंचित 9)
💠 वाशिम -14 (भाजप 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 2, इतर 4 )
💠 नागपूर -16 (भाजप 3, शिवसेना 0, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 9, इतर 2)
💠 पालघर-15 (भाजप 5, शिवसेना 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 0 इतर 1)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा