सोलापूर, दि. ३ जुलै २०२०: डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य कला व साहित्य अकादमी आयोजित महाराष्ट्राचा महावक्ता राज्यस्तरीय ऑनलाइन वकृत्व स्पर्धा २०२० चा निकाल आज जाहीर करण्यात आल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व महासचिव सुनील चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज ह्या विषयावर आयोजित सदरील राज्यस्तरीय महाराष्ट्राचा महावक्ता वकृत्व स्पर्धेत अर्णव मंगेश कदम, इयत्ता ६ वी, तपस्या पब्लिक स्कूल, आर्वी जि. वर्धा हा विद्यार्थी महाराष्ट्राचा महावक्ता ठरला आहे ह्या यशाबद्दल महाराष्ट्रभर त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
सदरील स्पर्धेत द्वितीय येण्याचा मान तनिष्का अनंतराव तेलभरे, इयता ५ वी एल. के. आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू जि. परभणी हिने मिळवला तर राज्यात तृतीय क्रमांक तृप्ती संतोष सुरोसे, इयत्ता १० वी, ज्ञानदीप विद्यालय, मुरबाड जि. ठाणे मा विद्यार्थांनीने पटकावला. सदरील स्पर्धेत राज्यभरातील १६४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून संघटनेच्या भव्य कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, महासचिव सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते, सतिष काळे, प्रा.शेषराव येलेकर, अंबादास रेडे, डाँ.विलास पाटील, राजकिरण चव्हाण ,विनोद आगलावे, शामराव लवांडे, अजित पाटील, वसंत नेरकर, राजेंद्र भोयर यांनी प्रयत्न केले.
महेश कदम अर्णव कदमचे वडील यावेळी म्हणाले की, “प्रथमतः स्पर्धा आयोजक टिमचे मनपूर्वक आभार. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना उजाळा देणारी अशी ही स्पर्धा कोरोना संकटाच्या काळात सर्व मुले ही घरीच असल्यामुळे आपण आयोजित केलेल्या अॉनलाईन वक्तृत्व स्पर्धेमुळे मुलांना आपले विचार मांडण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. माझा मुलगा चि.अर्णव मंगेश कदम, इयत्ता ६ वी, तपस्या पब्लिक स्कूल आर्वी, जि.वर्धा याने सदरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तो महाराष्ट्राचा महावक्ता झाला. ही बातमी कळताच आम्हाला खूप खूप आनंद झाला. ही स्पर्धा १०० टक्के परीक्षणावर होती. त्यामुळे योग्य वक्तृत्वाचे अचूक मूल्यमापन या स्पर्धेमध्ये झाले असे मला वाटते. आयोजक परीक्षक व संपूर्ण टीमचे पुन्हा मनस्वी आभार.”
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील