मुंबई : महाराष्ट्रात खाजगी रेल्वेगाड्या सुसाट धावण्याचा मार्ग नीती आयोगाच्या मंजुरीमुळे मोकळा झाला आहे. यासाठी सोलापूर, औरंगाबाद, पुणे, अकोला, शिर्डी इत्यादी स्थानकांहून व्यवस्था करण्यात आली आहे.
आयआरसीटीसीने २० गाड्यांचे वेळापत्रक आखले आहे. खाजगी रेल्वे चालवणाऱ्या कंपन्यांना बाजारभावाने तिकीट आकारणीचा अधिकार देण्यात आला आहे.
गाडी कोणत्या स्थानकावर थांबावयाची याचाही अधिकार कंपनीला असेल. भारतीय रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटांआधीच खाजगी रेल्वे सुटतील.
खासगी रेल्वेस १६० कि.मी. वेगाने धावण्याची परवानगीही देण्यात आली आहे. शिवाय या खाजगी रेल्वेगाड्यांना प्रथम प्राधान्य देण्याचेही ठरले आहे. खाजगी रेल्वेत प्रवाशांना सरकारी रेल्वेप्रमाणे तिकीट दरात कोणतीच सवलत देण्यात येणार नसून रेल्वे कर्मचाऱ्यांचे पासदेखील या रेल्वेत चालणार नाहीत.
विमानातील हवाई सुंदरीप्रमाणे खाजगी रेल्वेत रेल्वे सुंदरी असतील. रेल्वेत खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे असतील. या गाड्यांना १ तासापेक्षा अधिक विलंब झाला तर तिकिटाची अर्धी रक्कम प्रवाशांना परत केली जाणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक :
पनवेल-औरंगाबाद : आठवड्यातून २ दिवस
पनवेल-कलबुर्गी व्हाया सोलापूर : ३ दिवस
पनवेल-नागपूर : दररोज
पुणे -गुवाहाटी : १ दिवस
बांद्रा-अकोला : ३ दिवस
परेल-शिर्डी : ३ दिवस