राज्याच्या सहकार विभागांतर्गत गतिमान सेवा द्या, अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या सूचना

पुणे, ८ जुलै २०२३ : राज्याच्या सहकार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व विभागांच्या योजना, त्यांचे कार्य आणि सेवांची माहिती ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तत्काळ तयार करा तसेच ऑनलाईनद्वारे शेतकरी आणि नागरिकांना गतिमान सेवासुविधा देण्यावर भर देण्याच्या सूचना, सहकार पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिल्या. सहकार विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी साखर संकुल येथील सभागृहात सर्व विभागाची एकत्रित आढावा बैठक घेतली आहे.

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पगुच्छ देऊन राजेश कुमार यांचे स्वागत केले. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, पणन संचालक शैलेश कोतमिरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.

राजेश कुमार म्हणाले की, शेतकरी आणि नागरिकांना गतिमान सेवासुविधा द्यायच्या असतील तर संगणकीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी व्यवसाय सुलभता आणून नागरिकांना ऑनलाईनद्वारे लाभ घेता यावा, यादृष्टीने सरकार विभागाचे एकत्रित पोर्टल तातडीने विकसित करण्यात यावे, तीन महिन्यांत पोर्टलचे काम पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा