महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य: डॉ. शशिकांत तरंगे

इंदापूर, दि.४ मे २०२० : इंदापूर तालुक्यातील उपेक्षित कुटुंबाच्या गरिबीचे चटके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जाणले. त्यामुळेच गरीब कुटुंबांना धान्य वाटप व जीवनावश्यक वस्तू गावोगावी जाऊन देऊन, अक्षरशः गोरगरिबांच्या मदतीला धावण्याचे स्तुत्य काम अखंड सुरू ठेवले आहे. तालुक्यातील गावागावात गरिबांच्या मदतीला पत्रकार संघ मदत करतोय, असे गौरवोद्गार युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने गरीब, गरजू व शेतमजूर कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप इंदापूर तालुक्यातील  तरंगवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे व पत्रकार संघाचे मुख्य मार्गदर्शक मधुकर गलांडे यांच्या हस्ते सोमवार (दि.४) रोजी मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे, उपाध्यक्ष संदीप सुतार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, तरंगवाडी गावचे पोलीस पाटील दादासाहेब माने, माजी उपसरपंच बाबुराव तरंगे, तसेच पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य लक्ष्मण सांगवे,निखिल कणसे, शिवाजी पवार, दत्तात्रय गवळी, शिवकुमार गुणवरे, विजय शिंदे, इम्तियाज मुलाणी, उदयसिंह जाधव देशमुख, प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे, राजेंद्र भोसले, स्वप्नील चव्हाण, नाथा तरंगे, दादासाहेब तरंगे, अजिनाथ तरंगे, जिजाबा जाधव, समर्थ फरतडे, उत्तम यमगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.तरंगे म्हणाले की, गरिबांची तहान – भूक ओळखण्याची वृत्ती चांगल्या लोकांकडे असते. आयुष्यात आपण जोडलेल्या चांगल्या माणसांकडून मदत संकलित करून, गोरगरिबांच्या दारापर्यंत या मदतीचा ओघ पोहोचवण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका करत आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो. आयुष्यभर लेखणीच्या माध्यमातून समाजाचे उपेक्षित प्रश्‍न रेखाटणार्‍या पत्रकार बंधूंनी मोफत धान्य व जीवनोपयोगी वस्तू संकटाच्या काळात गरिबांपर्यंत पोचवले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील लेखणीला सोनेरी झालर सामाजिक जाणीवेची प्राप्त झाली आहे. अशीही माहिती प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिली.
याप्रसंगी कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपस्थित कुटुंबीयांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते म्हणाले की, पत्रकार संघाच्या माध्यमातून १७ गावांचा सर्वे करण्यात आला होता. मात्र संचारबंदी व लॉकडाऊन वाढल्यामुळे गरीब कुटुंबांना मदत करण्याची नितांत गरज ओळखून, आजपर्यंत तब्बल ६००० कुटुंबाच्या वर कुटुंबांना पत्रकार संघाने जीवन उपयोगी वस्तू मोफत देऊन आणखी दहा गावांना मदत देण्याची भूमिका ठेवली आहे. उपेक्षित कुटुंबांच्या चेहऱ्यावरील आनंद कोणत्याही बाजारात मिळत नाही, तोच आनंद आम्हा पत्रकारांना घेता येत आहे. यासारखी कोणतीही मोठी गोष्ट नाही अशी माहिती इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा