महाशिवआघाडीची राज्यपालांची नियोजित बैठक रद्द

मुंबई : महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालांसोबत असणारी आज (दि.१६) रोजी होणारी नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता स्थापन होण्यास अजून काही दिवस वाट पहावी लागणार हे नक्की?

महाशिवआघाडीतील नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार होते. परंतु ही भेट पुढे ढकलण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे एक शिष्टमंडळ सायंकाळी साडेचार वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. पण, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार त्यांच्या मतदार संघात असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नियोजित भेट पुढे ढकलली आहे.
ही भेट आता केव्हा होणार याबाबत मात्र स्पष्टता करण्यात आलेली नाही. पण, आता सोमवारनंतरच ही भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा