उरुळी कांचन, दि. ०५ नोव्हेंबर २०२०: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे हवेली पंचायत समितीच्या यापूर्वीचे उपसभापती युगंधर मोहन काळभोर, यांनी एक महिन्यापूर्वी उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली व हवेली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने हेमलता बेडेकर, यांनी तर भारतीय जनता पक्षाच्यावतीने अनिरुद्ध यादव, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारित वेळेत दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्याने मतदान घेण्यात आले यात हेमलता बडेकर यांना १६ मते तर अनिरुद्ध यादव यांना ०३ मते मिळाली यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी हेमलता बडेकर यांची उपसभापती निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
हवेली पंचायत समितीमध्ये सध्या २० पंचायत समिती सदस्य आहेत, तर अजिंक्य घुले यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे. या २० पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १० सदस्य आहेत. तर शिवसेनेचे ०६ व भारतीय जनता पक्षाचे ०३ सदस्य आहेत. राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने हवेली पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून हेमलता बडेकर यांच्या रूपाने एकच उमेदवार दिला होता. तर भारतीय जनता पक्षाने अनिरुद्ध यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामुळे हेमलता बडेकर व अनिरुद्ध यादव यांच्यात झालेल्या लढतीत हेमलता बडेकर यांनी १६ विरुद्ध ०३ आशा मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
यादरम्यान उपसभापती पदी विराजमान होताच आमदार अशोक पवार, यांच्या हस्ते हेमलता बडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, ता. अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, माजी उपसभापती सनी काळभोर, दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे, उपस्थित होते.
हेमलता बडेकर या शिरूरच्या आमदार अशोक पवार यांच्या कट्टर समर्थक असून उरुळी कांचन शिंदवणे या गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. दहा महिन्यांपूर्वी उपसभापती पदाची निवडणूकीत अशोक पवार यांनी आपले कट्टर समर्थक सनी काळभोर, यांना उपसभापती करून हवेलीवर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले होते. सनी काळभोर यांचा उपसभापती पदाचा दहा महिन्याचा कालावधी पूर्ण होतात त्यांना राजीनामा देण्यास सांगून उपसभापती पदाची आपल्याच दुसऱ्या कट्टर समर्थकाला उपसभापती बनवलेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे