महाविकासआघाडीचा ‘ किमान समान कार्यक्रम’

महाविकासआघाडीने आपला किमान समान कार्यक्रम गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर पत्रकार परिषद देऊन अधिकृतरित्या जाहीर केला. यात शेतकरी, महिला, बेरोजगारी, उद्योग यासह अनेक महत्त्वाच्या घटकांसाठी महाविकास आघाडी काय करणार याविषयी आराखडा तयार केला आहे, याची माहिती तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

शेतकरी –
पूर आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणार.
शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देणार.
पिकांचे नुकसान झाल्यानंतर तात्काळ पीक विम्याची मदत तात्काळ मिळावी, यासाठी पीक विमा योजनेत फेरबदल केले जाणार.
शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेणार.
दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणार.

बेरोजगारी –
सर्व रिक्त जागा तातडीनं भरण्यासाठी राज्य सरकार तात्काळ पाऊले उचलणार.
सुशिक्षित मात्र बेरोजगार असलेल्या तरुणांना छात्रावृत्ती (फेलोशिप) देणार.
नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात कायदा करणार.

महिलांना प्राधान्य…
महिला सुरक्षेला सरकार प्रथम प्राधान्य देणार.
आर्थिक स्थिती कुमकुवत असलेल्या गटातील मुलींना मोफत शिक्षण देणार.
शहरात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल उभारणार.
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कसच्या मानधनात वाढ करणार त्याचबरोबर सुविधा उपलब्ध करून देणार.
महिला रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन देणार.

शिक्षणाची गुणवत्ता वाढवणार…                                                                                          शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना हाती घेणार.
शेतकरी कामगार आणि आर्थिकदृष्ट्या मागास गटातील विद्यार्थ्यांना शून्य दराने शैक्षणिक कर्ज पुरवणार.

नगर विकास योजना…
नागरी भागातील रस्त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे योजना आणणार. नगर पंचायत, नगर परिषद आणि महापालिक क्षेत्रातील रस्ते चांगल्या दर्जाचे तयार करण्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद करणार.
झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रमातंर्गत मुंबई आणि महाराष्ट्रातील गरिबांना ३०० चौरस फूटांऐवजी ५०० चौरस फूटांचे सर्व सोयीसुविधायुक्त घर देणार.

आरोग्यासाठी तरतूद…
राज्यातील नागरिकांना चांगली आणि परवडणारी आरोग्य सुविधा देण्यासाठी एक रुपयात रुग्णालय योजना पॅथोलॉजी लॅबसह तालुका पातळीवर सुरू करणार. तसेच
जिल्हास्तरात सुपर स्पेशालिटी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करणार.
राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विमाचे संरक्षण देणार.

उद्योगांना प्राधान्य…                                                                                                              राज्यात नव्या उद्योगांना आणि गुंतवणुकीदारांना आकर्षित करण्यासाठी शक्य तितक्या सवलती देणार. त्याचबरोबर परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करणार.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी धोरणांमध्ये आवश्यक बदल करणार.

मूलभूत प्रश्न सोडवणार…
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, धनगर, इतर मागास प्रर्वगातील लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासह मूलभुत प्रश्न सोडवणार.
सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासपणा संपवण्यासाठी आणि घटनात्मक संरक्षण देण्यासाठी सरकार विविध योजना हाती घेणार.

पर्यटनावावर विशेष भर…
पारंपरिक पर्यटन केंद्रांना सुविधा पुरवून पर्यटन विकास केला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधांची विशेष तरतुदी. अन्न व औषधांतील नियमभंगाबद्दल कठोर शासन, सर्वसामान्यांसाठी अवघ्या १० रुपयांत स्वस्त व सकस आहार उपलब्ध करून देणार.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा