सलग पाचवा पराभव झाल्यानंतर महेंद्र सिग धोनी भावुक, सीएसकेच्या पराभवावर काय म्हणाला..

7
Mahendra Singh Dhoni Emotional after fifth defeat
सलग पाचवा पराभव झाल्यानंतर महेंद्र सिग धोनी भावुक

Mahendra Singh Dhoni Statement: :शुक्रवारी चेकॉप स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कोलकता विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा लाजिरवाणा पराभव झाला. ऋतुराज गायकवाड गंभीर दुखापतीमुळे बाहेर झाला. त्यामुळे धोनीने चेन्नईच्या संघाची जबाबदारी आपल्या हाती घेतली होती. ज्यावेळी धोनीने संघाची जबाबदारी घेतली तेव्हा सीएसकेच नाशिब चमकनायर असे वाटले होते. मात्र, सुरुवाती पासून चेन्नईची जी अवस्था होती ती तशीच राहिली. समण्यानंतर कर्णधार एमएस धोनीची पराभवाला घेऊन वेदना दिसत होती.सामन्यानंतर धोनीने प्रतिक्रिया दिली आहे

घरच्या मैदानावर केकआरविरुद्ध ८ विकेट्सने पराभव झाल्यानंतर महेंद्र सिंग धोनी म्हणाला, असे काही सामने आहेत ज्यात आम्ही आमच्या शैलीनुसार खेळू शकलो नाही. धोनीने कबूल केल की संघ धावा करण्यात अपयशी ठरला. तो म्हणाला की, जेव्हा तुम्ही खूप लवकर विकेट गमावता तेव्हा संघावर दबाव येतो. एकाही खेळाडूला मोठी भागीदारी करता आली नाही. पॉवर प्लेमध्ये आम्ही फक्त ३१ धावा करू शकलो. सलामीवीरांच्या आपयशाबद्दल धोनीने सांगितले की, ते दोघेही उत्कृष्ट फलंदाज आहेत.

कर्णधार म्हणून पुनरागमन करणाऱ्या एमएस धोनीसाठीही हा सामना खूपच निराशाजनक होता. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजी करायची होती, तरीही नाणेफेक गमावल्यानंतरही संघाला तेच काम मिळाले. यानंतरही संघ संघर्ष करताना दिसला.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा