कळंब, दि.१५ मे २०२०: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये कित्येक मजूर हे आपापले गावी परतण्याच्या मार्गावर आहेत. सर्व कामधंदे बंद असल्याने सगळीकडेच बिकट परिस्थिती दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये नागरिक पुढाकार घेऊन ठिकठिकाणी मदत करताना दिसत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गावाबाहेर , शहरात असणारे मजूर या लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये आपल्या गावाकडे परतण्याच्या मार्गावर आहेत. अशाच काही भटकणाऱ्या मजुरांना जिल्हा परिषद शाळा तांदूळवाडी तालुका कळंब येथे विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. गावातील महेश काळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या मजुरांचा विचार करत इतर खर्च टाळून या मजूरांना १४ दिवस पुरेल एवढे धान्य, किराणा तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड