पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य माढा तालुका अध्यक्षपदी महेशकुमार बाळासाहेब आवारे

माढा, १० ऑगस्ट २०२०: पदवीधर युवकांच्या प्रश्नांसाठी लढा देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र पदवीधर संघटनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी व त्यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य माढा तालुका अध्यक्षपदी महेशकुमार बाळासाहेब आवारे यांची निवड झाली. पदवीधर संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याद्वारे सामाजिक प्रबोधन, युवकांचा सक्रिय राजकारणात सहभाग यासाठी संघटना सातत्याने काम करत आहे. पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री सुजित थेटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यशोदीप कम्प्युटर्सचे संस्थापक श्री गोरख खटके सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

यावेळी युवा नेते जयदीप साठे,श्री गोरख खटके सर, हरिभाऊ माने, बाळासाहेब आवारे, संजय सलगर, अमोल पाटील, प्रवीण गायकवाड, रमेश लवटे, गणेश गायकवाड,राजेंद्र दडस आदी उपस्थित होते.

पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य माढा तालुकाध्यक्षपदी महेशकुमार आवारे यांची निवड झाल्याने युवक नेते जि.प सदस्य रणजीत भैया शिंदे, जि. प.सदस्य सौ अंजनादेवी शिवाजीराव पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक श्री.शिवाजीराव पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ अालेगाव खुर्द आदींनी अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा