नवी दिल्ली: महिलांवरील अत्याचारविरोधात कठोर कायदा करण्यासाठी सर्वांची सहमती मिळणार असेल तर असा कायदा करायला केन्द्र सरकार तयार आहे, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
हैदराबाद येथे महिला पशु चिकित्सक (डॉक्टर) वर बलात्कार करून तिला जाळयान्याच्या घटनेवर राज्यसभेत चर्चेच्या उत्तरात खासदारांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला.
काँग्रेसचे नेते गुलामनबी आजाद यांनी चर्चा सुरु केली. अशी प्रकरण सरकारने कठोरतेने हाताळावी, असे मत व्यक्त केले. इतर खासदारांनीही गुलामनबी यांना पाठिंबा त्यावर उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी उल्लेखित ग्वाही दिली.
यू. एन. के. रेड्डी म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली दारूची विक्री, हे देखील अशा गुन्हेगारी घटनांमागे कारण आहे. या गुन्ह्यातील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली.