आज लाल महल येथे ठाकरे गटाच्या महिला आघाडीने ‘माझं कुंकू माझा देश’ या घोषवाक्याखाली आंदोलन केले. आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना झाल्याने यावरून देशभरात चर्चा रंगली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी संघाबरोबर सामना खेळू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे. या विषयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देण्यात येत असून, विरोधकांनी बीसीसीआय आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात महिला आघाडीने आपल्या देशभक्तीच्या भावना व्यक्त करत आंदोलन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी पुजा मालुसरे












































