माझ्या हत्येचा रचला जातोय कट : ओवेसी

28

मुंबई : आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. असा खळबळजनक दावा एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
नुकतेच ‘ओवेसी यांना भर मैदानात उलटं लटकवून त्यांची दाढी कापण्याची’ धमकी भाजप खासदार डी. अरविंद यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ओवेसींनी सदरील दावा केला आहे.
याबाबत ओवेसी यांनी सांगितले की, आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. मी कोणाला घाबरत नाही. शहरात मी एकटा फिरत असतो. मी तारीख ठरवतो, तुम्ही येऊन मला मारून टाका, मी शाहिद व्हायला तयार आहे.
डी. अरविंद यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि ओवेसी यांनी केलेला दावा यामुळे आता नवीन राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा