माजी खासदार माधवराव पाटील यांचे निधन

7

नाशिक, दि.१४ जून २०२०: राजकीय, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या नाशिकचे माजी खासदार माधवराव पाटील ( वय ८०) यांचे आज निधन झाले.

१९९८ ते २००२ या काळात ते काँग्रेसचे खासदार होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.त्यांनी सहकार क्षेत्रात जनलक्ष्मी बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष संचालक संस्थापक पद भूषवले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे ते पहिले खासदार होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक त्यावेळी सिद्ध झाली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा