माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा निवडणूक रिंगणात

नवी दिल्ली, दि.९जून २०२० : माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) सर्वेसर्वा एचडी देवेगौडा पुन्हा राजकीय रिंगणात उतरत असल्याने राजकिय चर्चाना उधाण आले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी देवेगौडा राज्यसभेसाठी आज अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर देवेगौडा यांनी कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे.

एच डी देवेगौडा आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी याबाबत माहिती दिली.

जेडीएसचे विद्यमान खासदार कुपेंद्र रेड्डी यांच्या जागी देवेगौडा उमेदवारी दाखल करतील. देवेगौडा यांची बिनविरोध वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.

याबाबत जेडीएसचे नेते, आमदार यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर देवेगौडा यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली. सोनिया गांधी यांनी देवेगौडा यांना फोन करुन विनंती केली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. देवेगौडा यांनी तुमकूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला होता. कर्नाटकात राज्यसभेसाठी चार जागा आहेत. यासाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे. कर्नाटकमधून एका उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याइतक्या मतांची बेगमी काँग्रेसकडे आहे. यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दोन जागा भाजपला मिळणे निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे कर्नाटकची निवडणूक चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा