गोल पोस्ट महाराष्ट्र माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

मुंबई: माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७९ वर्षी त्यांचे निधन झाले आहे. मुंबईमधील हरकिसनदास रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. हरकिसनदास रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद इनामदार यांनी नाशिक मधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बरेच वर्ष काम केलं आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखालील पोलीस खात्यातील बरेच विद्यार्थी घडले आहेत.
इनामदार हे पोलीस खात्यामध्ये असताना एक कर्तृत्ववान कारकीर्द घडवली होती त्याच प्रमाणे रिटायरमेंट नंतर ही त्यांनी एक संवेदनशील लेखक म्हणूनही भूमिका बजावली होती. पोलीस दला मधील होणाऱ्या चुका व त्रुटी यांच्यावर त्यांनी वेळोवेळी बोट ठेवले होते याबाबत ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून लिखाण करायचे. जळगाव सेक्स स्कॅन्डल हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठं काम मानलं जात होतं.

error: Content is protected !!
Exit mobile version