माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींची प्रकृती चिंताजनक, सध्या व्हेंटिलेटरवर

नवी दिल्ली, दि. ११ ऑगस्ट २०२०: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत अजून सुधारणा होत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वताः सोमवारी याबाबत ट्विट करून माहिती दिली होती. तसेच त्यांच्या डोक्यात  रक्ताच्या गाठी जमल्यानं त्यांची ब्रेन सर्जरीही करण्यात आली. ब्रेन सर्जरी यशस्वी झाली मात्र त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं. कालपासून त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान देशभरातून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींसाठी प्रार्थना केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराह सिंह चव्हाण, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी राष्ट्रपतींसाठी प्रार्थना केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा