मध्य प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना ; पुलावरून बस कोसळून १५ ठार, तर २५ हून अधिक जखमी

मध्यप्रदेश, ९ मे २०२३: मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आज सकाळी ८.३० च्या सुमारास मोठी बस दुर्घटना घडली आहे. खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस पुलावरून कोसळली. यामध्ये १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २५ हून अधिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती खरगोनचे एसपी धरम वीर सिंग यांनी दिली आहे.

खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस अचानक बोराड नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून ५० फुट खाली कोसळली. MST हिरामणी ट्रॅव्हल्सची क्रमांक एम पी १० पी ७७५५ ही बस ओव्हरलोड होती. यामध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. यामधील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनरचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खरगोन जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी खरगोनचे एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदार तातडीने पोहोचले आहे. मध्य प्रदेश सरकारने बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये आणि किरकोळ जखमींना २५,००० रुपये तत्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा