अमरनाथ गुहेजवळ मोठी दुर्घटना, ढगफुटी, 13 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक बेपत्ता, बचावकार्य सुरू

जम्मू-काश्मीर, 9 जुलै 2022: जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता ढगफुटी झाली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक लोक बेपत्ता आहेत. भारतीय लष्कराच्या नेतृत्वाखाली NDRF, SDRF आणि ITBP च्या टीम रात्री उशिरा मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.

ढगफुटीनंतर टेन्ट मधून पुराचे पाणी वाहू लागले, त्यानंतर भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक लोक त्याच्या कचाट्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणात असून अनेकांची सुटका करण्यात आल्याचा दावा बचावकार्यात सहभागी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

बचावकार्य लवकरच पूर्ण होईल, असेही सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालटालच्या वाटेवर आयटीबीपी आणि एनडीआरएफची टीमही येथे तैनात करण्यात आली होती. या पथकांनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. एनडीआरएफ, प्रशासन आणि श्राइन बोर्ड यांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

सुमारे 8-10 हजार लोक यात्रेत सहभागी झाले होते. सायंकाळी उशिरा अमरनाथ गुहेजवळ ढग फुटी झाली. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितलं की, अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे 13 जणांचा मृत्यू झाला. अतुल करवाल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ढगफुटीची माहिती मिळाली तेव्हा एक टीम गुहेजवळ उपस्थित होती. आम्ही जवळपास तैनात असलेल्या पथकांनाही पाठवले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा