मोठी दुर्घटना; दर्शनासाठी जाणाऱ्या बारा भाविकांना कारनं चिरडलं, सहा जणांचा मृत्यु

गुजरात, २ सप्टेंबर २०२२: गुजरातमधील अरावली जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. येथे एका भरधाव कारने बारा भाविकांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील बहुतांश भाविक पंचमहाल जिल्ह्यातील कालोल येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे‌.

अरवलीतील कृष्णापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरवलीतील अपघाताचा तपास सुरु आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. गुजरातचे अंबाजी मंदिर हे भक्ति, शक्ति आणि श्रद्धा यांचा संगम असल्याचे म्हटलेजाते.

या देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. या घटनेनं संपूर्ण परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा