मुंबई, २४ जानेवारी २०२३ :मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी करावाई केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून, पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ आणि २३ जानेवारी रोजी मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन परदेशी नागरिकांना अटक केली. या दोघांकडे असलेल्या पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले ९० हजार USD आणि अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवलेले पेस्ट स्वरूपात २.५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
यापूर्वी, २७ ऑक्टोबर रोजी अशाच प्रकारात, अधिकाऱ्यांनी दोन भारतीय प्रवाशांकडून मेणाच्या स्वरूपात वितळलेले एक कोटींहून अधिक किंमतीचे सोने पकडले होते. हे आरोपी दुबईहून पायाला सोन्याचे मेण गुंडाळून आले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.