कोलकाता विमानतळाचे अम्फान वादळामुळे मोठे नुकसान

कोलकत्ता, दि. २१ मे २०२०: अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये नुकसान झाले आहे. तशी १६० ते १८० वेगाने वारे वाहत आहे. या चक्रीवादळामुळे आत्तापर्यंत १० ते १२ लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. कोलकत्ता मध्ये याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोलकत्ता मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कोलकत्ता मध्ये सर्वात जास्त नुकसान कोलकत्ता विमानतळाचे झाले आहे. विमानतळावर सर्वत्र पाणी साठले आहे.

सलग सहा तासा पासून सुरू असलेल्या या चक्रीवादळामुळे कोलकत्ता विमानतळाचे मोठे नुकसान केले आहे. पूर्ण विमानतळ मोडकळीस आले आहे. सगळीकडे पाणी भरले आहे. रनवे आणि हँगर्स पाण्यात बुडलेले आहेत. विमानतळाच्या एका भागात बर्‍याच पायाभूत सुविधा पाण्यात बुडून गेल्या आहेत. अम्फानमुळे विमानतळावरील सर्व कामकाज आज पहाटे पाच वाजेपर्यंत बंद होते , जे अजूनही बंद आहे .

कोलकत्ता विमानतळावर २५ मार्च पासूनच सर्व यात्री उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. वंदे भारत मिशनला जाण्यासाठी फक्त मालवाहतूक उड्डाणे सुरू होती. त्यांनाही थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंगालमधील समुद्रकिनार्‍यावर धडक देताना अम्फानच्या वादळाची गती ताशी १८० किमीपेक्षा अधिक गेली होती.

मागच्या काही तासांपासून सतत कोलकत्ता मध्ये तशी १३० कि.मी. वेगाने वरे वाहत होते. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना, दक्षिण २४ परगना, मिदनापूर आणि कोलकाता येथे अम्फानचा सर्वाधिक कहर झाला. वादळाचा तडाखा होता तेव्हा दिघा मध्ये उभे राहणेही शक्य नव्हते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा