लॉकडाऊनमध्ये रोपवाटिका धारकांचे मोठे नुकसान  

बारामती, २७ एप्रिल २०२०: राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलाव टाळण्यासाठी संचारबंदी घोषित झाल्याने लॉकडाऊनमध्ये  रोपवाटिका धारकांचे  मोठे नुकसान झाले आहे. कळस (ता.इंदापुर ) येथील तयार रोपांना ग्राहकच नाही. वाहतूक व्यवस्थाही ठप्प असल्याने रोपवाटिकेतील सुमारे २५ लाख गुलाब व शोभेची रोपे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

इंदापुर तालुक्यातील कळस या ठिकाणी गेली ३० वर्षांपासून रोपवाटीका व्यावसाय आहे. प्रामुख्याने या ठिकाणी गुलाब रोपांची निर्मिती केली जात होती. याठिकाणी दरवर्षी सुमारे २५ लाख रोपांची निर्मिती केली जाते. तसेच येथील रोपवाटीका धारकांनी  विस्ताराने सर्व रोपे तयार करून आपल्या व्यावसायाला मोठे स्वारुप दिले. या ठिकाणी लहान मोठ्या सुमारे ५० रोपवाटिका आहेत. तसेच यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सुमारे ५०० आहे. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेकडो महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध होत होता. त्यांचेही नुकसान झाले आहे.

आपल्या व्यावसायात रोपवाटीका मालकांनी चांगली प्रगती साधली होती. मात्र कोरोनाचा फैलाव झाल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली. अत्यावश्यक सेवा
वगळता सर्व वाहतूक  बंद झाली. त्यामुळे
रोपवाटिकाधारकांचा विक्रीचा माल वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील रोपांना आंध्रप्रदेश मधील राजमंड्री, गुजरात मधील अहमदाबाद कर्नाटक मधील विजापूर व राज्यातील पुणे लातूर नांदेड उस्मानाबाद या ठिकाणी मोठी मागणी असते. विक्रीचा काळ लोटला असल्याने गुलाबाची कळीधारण केलेली रोपे फेकून द्यावी लागणार आहेत. यामुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. तसेच नियमित विक्रीचा
लिंब, चिंच, अशोक, गुलमोहर, करंज, अर्जुन, जांभूळ, बेहडा, हिरडा, बदाम, निलगिरी, बांबू, रेन ट्री, पारिजातक, फायकस, या शोभेच्या नाशवंत मालाची प्रत खराब होऊन नुकसान सोसावे लागणार आहे. उन्हाळी हंगामात शोभेच्या रोपांना चांगली मागणी असते, पण लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने माल पडून राहिला आहे.

लाखोंच्या पटीत रोपवाटीका धारकांचे नुकसान:

उत्पादित मालाला प्रतिरोपाला संगोपन करताना मोठा खर्च येत आहे. रोपवाटीका धारकांनी हजारोंच्या पटीत माल तयार केला आहे. त्यामुळे लाखोंच्या पटीत रोपवाटीका धारकांचे नुकसान होत आहे. विलास पानसरे, कळस (रोपवाटीका धारक)

न्यूज अनकट प्रतिनिधी बारामती: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा