रोहा येथील डाय केमच्या गोडाऊनमध्ये मोठी आग

रायगड, ७ जून २०२३: धाटाव औधोगिक वसाहतीमधील रोहा येथील डाय केम कंपनीच्या युनिटमधील गोडावूनमध्ये आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागली आहे. त्यामुळे एकामागून एक स्फोटांची मालिका सुरू झाली आहे. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जात प्रचंड धुराचे लोट दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार किशोर देशमुख, पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर, अग्निशमन दल, एम आय आय डी सी सहाय्यक अभियंता विनीत कांदळगावकर हे घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले आहे.

आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धाटाव औधोगिक अग्निशमन दल, रोहा नगरपरिषद अग्निशमन दल, सुप्रीम कंपनीचे अग्निशमन दल यांचे बंब आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी रोहा डायकेम टेक ओव्हर केलेली वेलकम कंपनी प्लांट नंबर दोनमधील गोडाऊनमध्ये अचानक आग लागली.

सदर दुर्घटनेमध्ये प्रथमदर्शनी प्रयाग हशा डोलकर हा सकाळी नऊ वाजल्यापासून ड्युटीवर असताना अचानक आग लागली यात तो गंभीर जखमी झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. अनिकेत तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा