पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल

पुणे, ३१ जुलै २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १ ऑगस्ट रोजी पुण्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतील. यानंतर सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नंतर १२:४५ वाजता पंतप्रधान मोदी दुसऱ्या फेजच्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, एस. जा. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवादान चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, एअरपोर्ट रोड या मार्गावरील वाहनधारकांनी या मार्गाचा वापर टाळून गैरसोय टाळण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा