मकरसंक्रांतिच्या शिवस्पर्शी शुभेच्छा

संक्रांत म्हणजे संक्रमण. मार्ग ओलांडून जाणे. नात्यांमधली कटुता विसरून, दुरावा विरून गुळाची गोडी आणि तिळासारखा स्नेह वृद्धिंगत करणारा हा सण. हलव्याचे दागिने साकारताना एक एक तिळगूळ-हलवा एका धाग्यात गुंफवा लागतो. सर्वसमावेशक वृत्ती यातून दिसून येते. मनातील हेवेदावे विसरून एका ओळीत गोडवा, नाती जपणे, सारी नाती बांधून ठेवणे, हे प्रमुख सूत्र यात असावे. वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा हा सण सोबत गोडव्याचा अन् स्नेहाचा संदेश आणणारा, वर्षभरासाठी मंगल चिंतणारा.

माणसा माणसा मधली नाती दृढ करायची, नवी नाती निर्माण करायची आणि त्याचबरोबर केवळ कौटुंबिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक पातळीवरही एकोपा निर्माण करायचा, ही भावना !
खरं तर सोशल मीडियाच्या या काळात द्वेष विरहित जीवन जगणे हे केवळ अश्यक्यप्राय होऊन बसलंय. व्हाट्सअप वर तर सकाळी उठल्यापासून जाती-धर्मात फक्त द्वेष पसरवणारे अनेक महाभाग आपल्या लिस्टमध्ये असतात आणि फेसबुकच कधी द्वेषबुक झालय हेही आपल्याला कळाल नाही. तेव्हा संक्रांतीच्या निमित्ताने आपणही मनातील सर्व द्वेष बाहेर काढूया. मनातील सर्व हेवेदावे विसरून, मनातील कटुता दूर सारून सुहास्य वदने सर्वांना तिळगुळ देऊया आणि प्रेमाने बोलूया…!!
हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, हम सब भाई भाई.
Be_happy
सबका मंगल हो.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या सर्व बांधवांना टीम न्यूज अनकट कडून શુभेच्छा….!!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा