नीरा : संक्रांतीच्या मुहूर्तावर पुजेसाठी लागणाऱ्या खणाच्या किमतीत वाढ झाली आहे. तर खारकीच्या किमतीत गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर पुजेसाठी लागणारे साहित्याच्या व तरकारीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
नीरा येथे आज संक्रतीनिमीत्त विशेष बाजारात भरवण्यात आला होता. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
संक्रातीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी नीरा व परिसरातील नागरिकांनी आठवडे बाजार व बाजारपेठेत गर्दी केली होती. नीरा येथील बाजारात संक्रांतीसाठी लागणाऱ्या सुगडीच्या खणा मागे दहा रुपये वाढल्याचे पहिल्या मिळाले. गेल्यावर्षी पन्नास रुपयाला मिळणारे खण यावर्षी साठ रुपये झाले. त्याचबरोबर संक्रांतीच्या पूजेसाठी लागणारे हळद, कुंकू, बदाम यांसारख्या वस्तूंच्या किमती स्थिर असल्या तरी खारकेच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.
पुजेसाठी लागणारे बदाम १००, पावशेर सुपारी १०० पावशेर, खारका ७० पावशेर, हळकुंड ४० पावशेर, हळद ४० रूपये पावशेर, खोबरे २०० किलो, तीळ ६० पावशेर.तर कुंकू २० रूपये पावशेर या भावाने मिळत होते .यामध्ये खारकांच्या भावात गेल्या वर्षी पेक्षा दुपटीने भाव वाढ झाली आहे. तर खोबरेही थोड्या फार फरकाने महागले आहे. सुवासिनींच्या ओवशाच्या साहित्यातील तरकारीच्या किमतीतही पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ओवशाच्या साहित्यामध्ये हरभरा २० पेंडी, गाजर ४०, बोर ६० संक्रांती घेवडा १२० वाटाना ५० वांगी ६० रूपये किलोप्रमाणे विकले जात होते. नेहमीपेक्षा वस्तूंचे भाव वाढल्याचे पहायला मिळाले. महागाई वाढलेले असली तरी महिलांनी सनाचा बाजार असल्यामुळे जोरदार खरेदी केली. कुंभारकाम करणे हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. संक्रातीचा सण हा आमच्यासाठी उत्पन्नाचे एक मोठे साधन असते. यासाठी पूजेला लागणारे सुगडी आम्ही बनवत असतो. यावर्षी या सुगड्यांच्या एका खणाला दहा रुपयांनी भाव वाढवून मिळाला आहे. त्यामुळे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. आताचे तरूण हा व्यवसाय करत नाहीत. त्यामुळे मालाची टंचाई निर्माण होते व भाव वाढतो.
-निखील राजे, कुंभार व्यसाईक