बारामती, दि. ५ जुलै २०२०: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभेत राज्यातील सर्वात जास्त मतांनी निवडून दिल्याने अजित पवार यांनी त्यांच्या अनेक भाषणात तुम्ही मला भरभरून दिले मी देखील विकास कामात कुठे कमी पडणार नाही असा मतदारांना शब्द दिला आहे.सध्या बारामती तालुक्यातील विकासकामे करत असताना भविष्यातील गरजा व अडचणी लक्षात घेवून, विकासकामे करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
शनिवारी दि ४ रोजी त्यांनी विकासकामांच्या पाहणी दौऱ्यात केल्या आहेत.
बारामती शहरातील तसेच तालुक्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहरातील सुरू असलेल्या विकास कामांना भेटी दिल्या यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची ,माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन अंतर्गत रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, क्रिडा संकुल, गौतम बाग येथे सुरु असणाऱ्या विकास कामांची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या विविध विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी बारामतीच्या भौगोलिक परिस्थिती मध्ये टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी, तसेच आसपासचा परिसर सुशोभित करावा, कामाच्या ठिकाणी येणा-या नागरीकांना प्रसन्न वाटावे असे प्रसन्न वातावरण असावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील,मुख्याधिकारी किरणराज यादव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी