नवी दिल्ली, २० ऑक्टबर २०२२:सरकारच्या स्पर्धा आयोगाने (Competition Commission) बाजारातील आपल्या स्थानाचा चुकीचा फायदा उचलल्याबद्दल, देशातील ऑनलाइन ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बड्या कंपन्या मेक माय ट्रीप, गोआयबिबो आणि ओयो या ब्रँड्सला धडा शिकविला आहे. या कंपन्यांवर स्पर्धेचे नियम तोडल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
या दोन कंपनीच्या हावरट पणामुळे इतर कंपन्या आणि प्रतिस्पर्ध्यांना बाजारात मोठे नुकसान झाले आहे. ही बाब सिद्ध झाल्याने स्पर्धा आयोगाने हा दंड ठोठावला आहे.
स्पर्धा आयोगाने निर्देश दिले की, या दोन्ही ब्रँड्सने हॉटेल आणि चेन हॉटेलच्या त्यांच्या नियमात बदल करावा. त्यामुळे या क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही काम करता येईल आणि सेवेचा लाभ देता येईल. त्यांनी एकप्रकारे एकाधिरशाही आणण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. हे दोन्ही ब्रँड प्रतिस्पर्ध्यांना आणि इतर ब्रँड्सला व्यवसाय करण्यासाठी कसलीही मुभा देत नव्हती. त्यांना रेटमध्ये सवलती अथवा इतर बाबींमध्ये सहभागी करुन घेत नव्हती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे